काव्यरत्नावली चौकात 2223 श्री गणेश मुर्ती व 3 ट्रॅक्टर निर्माल्याचे संकलन

जळगाव प्रतिनिधी । भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाला आळा घालण्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी काव्यरत्नावली चौक, जळगाव येथे अनंत चतुर्दशी रविवारी श्री गणेश मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी 2223 घरगुती व सार्वजनिक श्रीगणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले. यासह 3 ट्रॅक्टर निर्माल्य संकलित करण्यात आले.

सकाळी 7.10 वाजता पहिली मुर्ती संकलीत करण्यात आली व सायंकाळी 9.55 मि. शेवटची मुर्ती संकलीत झाली. दिवसभरात 2223 कुटुंबांनी या केंद्रावर भेट देऊन श्री. गणेश मुर्ती केंन्द्राला अर्पण करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी  अभिजित राऊत यांनीदेखील या ठिकाणी आपल्या घरगुती मुर्तीला अर्पण केले.

केंद्राला महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, आयुक्त सतिश कुळकर्णी, पोलीस उपअधिक्षक कुमार चिथा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट दिली.

संकलित मुर्त्या विधिवतपणे सजविलेल्या दोन ट्रक व दोन ट्रॅक्टरच्या सहाय्याने मेहरूण तलाव येथे नेऊन विसर्जित करण्यात आल्या. सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत सदर उपक्रम सुरू होता. यशस्वितेसाठी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, अमित जगताप, प्रितम शिंदे, पियुष तिवारी, अर्जुन भारूळे, सयाजी जाधव, वेदांत दुसाने, संस्कृती नेवे, वैष्णवी भांडारकर, विनिता पाटील, दिनेश पाटील, वैष्णवी खैरनार, यश भालशंकर, अजय चव्हाण, तृषांत तिवारी, दिक्षांत जाधव, सागर सोनवणे, जयेश पवार, भुषण सोनवणे, तेजस श्रीश्रीमाळ, अमोल सोनवणे, भटू अग्रवाल, गोपाल पांडे, योगेश वानखेडे, दर्शन भावसार, भवानी अग्रवाल, प्रशांत वाणी, राहूल चव्हाण, सागर निकम, उमेश देशमुख, निरंजन पाटील, शिवम महाजन, राहूल ठाकूर, कन्हैय्या सोनवणे, करण शहा, सागर जगताप, मनजीत जांगीड इत्यादींनी परिश्रम घेतले.

केंद्रावर विसर्जन आरती करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याचा नागरिकांनी लाभ घेतला. युवाशक्तीचे 50 स्वयंसेवक, रामानंद पो.स्टे. चे 10 कर्मचारी, पुजा विधीसाठी ब्राह्मण, निर्माल्य संकलनासाठी मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content