सिंधी कॉलनी परिसरात तरूणाला बेदम मारहाण; जिल्हापेठ पोलीसात तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडण्याच्या वादातून तिघांनी शनिवारी मध्यरात्री बेदम मारहाण केल्याची घटना सिंधीकॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

अधिक माहिती अशी की, पृथ्वी राजकुमार चंदनानी (वय-२५) रा. चंदूलाल रसवंती जवळ, गणेश कॉलनी हे नामेदव कुळकर्णी यांच्या घरात गेल्या ४ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. कामाच्या निंमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीएल २२०७) दुचाकी असून कामासाठी दुचाकीचा वापर करतात. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता नवदुर्गा मित्रमंडळ सिंधी कॉलनी येथे भाविकांसाठी प्रसाद बनविण्याचे काम करत असतांना थोड्यावेळाने ते झोपले. सकाळी ३.४५ वाजता झोपेतून उठल्यानंतर ते सिंधी कॉलनी मंदीरासमोरील हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी गेले. सौरभ जैसवाल हा तिथे आला आणि गेल्या वर्षी तुला वापरण्यासाठी दिलेला मोबाईल मागितला. मात्र सौरभकडून कोणताही मोबाईल घेतला नाही असे सांगितल्यानंतर सौरभ यांच्यासह अनोळखी दोन ते तीन जणांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर पृथ्वीच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून घेतला. पृथ्वी यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सौरभसह इतर दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

Protected Content