औरंगाबाद – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
याप्रसंगी व्यक्त होतांना ‘मी पुन्हा येईल’ असे जे म्हणत आहेत त्यांना आघाडी सरकारला अडीच वर्ष झालेली असल्याचा विसर पडला आहे. असं विधान करत त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.
यासह ‘भोंगा आणि हनुमान चालीसा’ या प्रकरणावर व्यक्त होताना “त्यांनी हिंमत असेल तर काश्मीरमध्ये हनुमान चालीसा म्हणून दाखवा.” असं आवाहन नाव न घेता राज ठाकरे यांना दिलं.
पुढे व्यक्त होताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना यांनी कधीही मुस्लिम द्वेष केला नाही असे सांगत त्यांनी ‘हृदयात राम आणि हाताला काम’ हि खरी हिंदुत्वाची व्याख्या असल्याचं सांगितलं.
भाजपाचे प्रवक्ते हे वेगवेगळ्या विषयावर व्यक्त होत आहेत. त्यांना पैगंबर यांच्यावर बोलायची काही गरज नव्हती. त्यांनी यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भारतावर नामुष्की ओढवली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे पश्चिम आशियामध्ये कचराकुंडीवर पंतप्रधानांचा फोटो लावला जातोय. असं म्हणत त्यांनी भाजपाच्या प्रवक्त्यावर टिकास्त्र सोडलं.
मोदी सरकार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, “लोकांनी टीका केली की हे सरकार योजना राबवत. उज्वला योजनेट लोकांना गॅस सिलेंडर मिळत नव्हतं, लोकांनी बोंबाबोंब सुरू केली त्या वेळी पुन्हा ही योजना सुरू करण्यात आली. पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत देखील तेच धोरण अवलंबण्यात आलं. अगोदर किंमत वाढवली. लोक आरडाओरड करायला लागले की पुढे किंमत कमी केली. याप्रकारे सरकार हे जनसामान्यांच्या भावनेशी खेळत असल्याचं विधान ठाकरे यांनी याप्रसंगी केलं.