Home Cities जळगाव मुख्यमंत्र्यांनी जैनच्या विविध उपक्रमांची केली वाखाणणी

मुख्यमंत्र्यांनी जैनच्या विविध उपक्रमांची केली वाखाणणी

0
49
cm at grf jalgaon


जळगाव प्रतिनिधी । अनुलोम संस्थेच्या कार्यक्रमासाठी जळगावात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैने समूहाच्या विविध उपक्रमांना भेटी देऊन त्यांची वाखाणणी केली.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तुरबा सभागृहात अनुलोम संस्थेच्या रविवारी झालेल्या तिसर्‍या वार्षिक बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित होते. फडणवीस यांचे स्वागत जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जैन हिल्स येथील सुंदर अशा परिसरात उभारण्यात आलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वैशिष्ट्येपूर्ण वास्तूचे त्यांनी अवलोकन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांबद्दल जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. तसेच त्यांनी कंपनीच्या कामाकाजाबद्दल, भविष्यातील प्रकल्पाबद्दलची माहिती जाणून घेतली.


Protected Content

Play sound