पाकबाबतच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

30BMDEVENDRAFADNAVIS

सातारा प्रतिनिधी । शरद पवार यांनी पाकिस्तानबाबत केलेल्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला असून पवारांनी मतांचे राजकारण करू नये असा सल्ला दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अल्पसंख्यांकांच्या मेळाव्यात बोलतांना पाकमध्येही चांगली माणसे असल्याचे वक्तव्य केले होते. काही लोक भारत व पाकमध्ये फुट पाडत असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. येथील महाजनादेश यात्रेत पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूष होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते. पवार यांनी मतांचे राजकारण करू नये असा सल्लादेखील त्यांनी दिला.

Protected Content