पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील महाराष्ट्र शासनाचा शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी, तसेच शेत पानंद रस्ता चळवळ, शेत पानंद रस्ता कृती समितीच्या वतीने पारोळा येथे प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दिवसेंदिवस होणारी भाऊ हिस्सेदारी, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाचे उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरणही परिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोचवण्याकरिता पेरणी अंतर्गत मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय सर्पदंश, विज पडणे पूर येणे आग लागणे. या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढता धोका त्याच बरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यात आहे.
शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासोबतच विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारमाही दर्जेदार शेत रस्त्यांची त्यांची आवश्यकता असून तहसील प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णयांची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना न्याय देत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता केसेस तातडीने निकाली काढणे, शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तसे तातडीने आदेश देण्यात यावे.
शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या तहसील कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा, शेत रस्ते अभावी पडीक राहणाऱ्या शेतजमीन धारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी असे आशयाचे निवेदन. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, तालुका अध्यक्ष भिकनराव पाटील छावा संघटनेचे. तालुका अध्यक्ष विजय पाटील, दत्तू पाटील, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, सुनील पाटील, सदाशिव पाटील, शरद पाटील, प्रदीप राजपूत, हरीश भंडारी, संभाजी बाविस्कर, भाऊसाहेब पाटील, अरुण पाटील, भागवत महाजन, महेंद्रसिंग गिरासे, रामसिंग गिरासे इत्यादी शेतकरी व पानंद रस्ता कृती समितीचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.