जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात एक तास स्वच्छतेसाठी या अभियांनातर्गत रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात स्वच्छता राबविण्यात आले.
शासनाच्या निर्देशनानुसारत देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने एक तास स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत रविवारी १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी पोलीस ठाण्याच्या परिसरात स्वच्छता करण्यात येवून एक ट्रॅक्टर कचरा काढण्यात आला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, राजेंद्र उगले, पो.कॉ. किरण भोई, शिवदास नाईक, सुनिल सोनार, योगेश बारी, संजय धनगर, पवन कुमावत, तुषार गिरासे, अतुल पाटील, छगन तायडे, गफ्फार तडवी, मंदार पाटील, किरण पाटील, साईनाथ मुंडे, रामकृष्ण पाटील, राहूल रगडे, यांच्यासह आदी उपस्थित होते.