अमळनेर (प्रतिनिधी) तालुका क्रीडा समितीतर्फे एच.एस.सी.तील गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. एच.एस.सी.चा निकाल नुकताच लागला असून त्यात एन.टी.मुंदडा महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.पायल आनंदराव नेतकर हिने ९०.१२% टक्के मिळवत तालुक्यात व्दित्तीय क्रमांक व एन.टी.मुंदडा महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
ती के.डी.गायकवाड हायस्कुलचे मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर यांची मुलगी आहे. कु.पायल ही एक राज्यस्तरीय उत्कृष्ट खेळाडू सुध्दा असून तिने शिक्षणाबरोबर खेळातसुध्दा प्राविण्य मिळवलेले आहे. म्हणून तिचा येथील तालुका क्रीडा समिती तर्फे नुकताच पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक ए.व्ही.नेतकर, समिती प्रमुख एस.पी.वाघ, प्रा.ए.के.अग्रवाल, के.यु.बागुल, एन.डी.विस
पुते, रोहिदास महाजन, विनायक सुर्यवंशी उपस्थित होते.