भुसावळात सत्ताधार्‍यांमध्ये बेबनाव; भोळे व लोणारींमध्ये शाब्दीक चकमक

bhusawal nagarpalika meeting

भुसावळ प्रतिनिधी । येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष रमण भोळे आणि माजी उपाध्यक्ष युवराज लोणारी यांच्यात शाब्दीक चकमक उडाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नगरसेवक युवराज लोणारी यांनी नगराध्यक्षांना घरचा आहेर दिला. त्यांनी अमृत योजनेच्या पाइपलाइनसाठी खोदकामानंतर ठेकेदाराने खड्डे बुजवले नसून त्याच्या कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने आपण ठेकेदारावर काय कारवाई केली? याची माहिती नगराध्यक्षांनी सभागृहाला द्यावी, अशी मागणी केली. यानंतर या दोन्ही मान्यवरांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. स्वीकृत नगरसेवक प्रा. सुनील नेवे यांनी मध्यस्थी करून हा वाद सोडविला. मात्र या चकमकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता नितीन लुंगे यांच्या मनमानीबाबत युवराज लोणारी व निर्मल कोठारी यांनी नाराजी व्यक्त केली. जनआधारचे गटनेते उल्हास पगारे यांनीही हीच तक्रार केली. या पार्श्‍वभूमिवर, नगराध्यक्षांनी लुंगे यांना सूचना दिल्या.

Protected Content