अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।तालुक्यातील दहीवद गावात गावातील मरीमाता चौकात सिमेंटचे बाकडे फोडल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील दहीवद गावात असलेल्या मरीमाता चौकात सिमेंटचे बाकडे ठेवण्यात आले आहे. दरम्यान बुधवार ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता बाकडे फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. त्यामुळे एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण सुरुवात करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेले. दरम्यान पहिला गटातील मुस्ताक सलीम खाटीक वय-३५ याने मुरली कौतीक महाजन, समाधान मुरली महाजन आणि पंकज चिंधू महाजन यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या गटातील मुरलीधर कौतिक माळी वय ५५ यांनी मुस्ताक सलीम खाटीक, रहमान जुम्मा खाटीक, शाहरुख रहमान खाटीक यांच्या विरोधात तक्रारी देण्यात आले. दोन्ही गटातील आलेल्या तक्रारीनुसा एकुण ६ जणांविरोधात परस्पर विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव आणि संदेश पाटील हे करीत आहे.