राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या मतमोजणीस प्रारंभ

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळपासून सुरू करण्यात आली असून लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतदान प्रक्रिया येथील नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयात रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडली. यावेळी ३ हजार तीनशे ४५ मतदात्यांपैकी २६२४ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यामुळे एकूण ७८.४४ टक्के मतदान करण्यात आले. विकास पॅनल, नानासाहेब चव्हाण स्मृती पॅनल व परिवर्तन पॅनल यांच्यात ही लढत होत आहे. १९ जागांसाठी ५१ उमेदवार हे रिंगणात उतरले आहे. मतदानाच्या दिवशी सर्व पॅनलच्या समर्थकांनी आपापल्या पॅनलच्या विजयाचा दावा केला होता.

दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. यात प्रारंभी मतपत्रीका एकत्र करण्यात आल्या. यानंतर मतमोजणी सुरू झाली. येत्या काही तासात विजय कुणाचा होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content