पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात नुकत्याच कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑक्सीजन सेंटरची पाहणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी केली.
याबाबत वृत्त असे की, पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन प्रणाली सुरू करण्यात आल्यामुळे कोवीड रुग्णांसाठी दिलासा मिळाला असून सध्या सहा कोरोना बघीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या अनुषंगाने गुरूवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी रुग्णालयास भेट देवून रुगालयाची पाहणी केली. पहूर ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक तथा नोडल अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वैद्यकिय यंत्रणा समाधानकारक कार्य करीत असल्या बद्दल डॉ. चव्हाण यांनी प्रशंसा केली.
अलीकडेच १ ऑगस्ट २०२० रोजी माजी जलसंपदा मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते पहूर ग्रामिण रुग्णालयात सेंट्रल ऑक्सीजन पाईप लाईन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दिलासा मिळत आहे. येथे सध्या ६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांवर पहूर ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत .
वैद्यकिय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांच्यासह वैद्यकिय अधिकारी, परिचर, परिचारीका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि संपूर्ण वैद्यकिय यंत्रणा तत्परतेने सेवा करीत आहे. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळत आहे.
सेंट्रल ऑक्सीजन प्रणाली अंतर्गत असलेल्या ३० पैकी १५ खाटा कोवीड रुग्णांसाठी असून उर्वरित १५ खाटा या नॉन कोवीड रुग्णांसाठी आहेत .गरजू रुग्णांनी काही लक्षणे आढळल्यास स्वतःहून ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.