नांद्रा येथे सेवानिवृत्त सैनिकाचा नागरी सत्कार ; गावातून भव्य मिरवणूकही काढली

f1ad5713 ba45 41bf 9b10 f31fdbebb1bb

 

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील नांद्रा येथील समाधान लोटन पाटील हे नुकतेच भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त झालेत. यानिमित्त गावकऱ्यांनी गावातून मोठ्या जल्लोषात भव्य मिरवणूक काढत श्री.पाटील यांचा नागरी सत्कार केला.

 

 

समाधान पाटील यांनी तब्बल सतरा वर्ष देशसेवा केली. ते नुकतेच राजस्थान येथून सेवानिवृत्त झालेत. त्यांचा सेवानिवृत्त व कर्तव्यपूर्ती सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला. सर्वप्रथम पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर समाधान पाटील यांची सुशोभित केलेल्या व तिरंगाने सजलेल्या खुल्या जीपमधून भव्य मिरवणूक नांद्रा गावातून काढण्यात आली. या प्रसंगी भारत माता की जय ,वंदे मातरम, वीर जवान तुझे सलाम ,जय जवान जय किसान अशा घोषणांनी गाव दुमदुमून गेले होते. यानंतर त्यांच्या घराजवळ आप्तेष्ट ग्रामस्थ व सर्व मित्रमंडळी यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. या प्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील काही माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देतांना समाधान पाटील यांनी आतापर्यंत देशाची सेवा करत असताना आलेले चित्तथरारक अनुभव व शौर्य गाथा सांगीतल्या. तसेच यापुढे सार्वजनिक जीवनात जगतांनाही विधायक व सामाजिक कार्यासाठी नेहमी पुढे राहील असे सांगितले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव तावडे यांनी केले. या प्रसंगी समाधान पाटील यांच्या मातोश्री आशा लोटन तावडे, नितीन तावडे, विनोद बाविस्कर, प्रा. यशवंत पवार, पंकज बाविस्कर, योगेश सूर्यवंशी, शिवाजी तावडे, बालु बाविस्कर, पत्रकार नगराज पाटील, साहेबराव साळवे, प्रकाश सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, घनश्याम खैरनार, एस.ए.पाटील, बापू सूर्यवंशी, सखाराम पाटील, विनोद तावडे, अनिल तावडे योगेश तावडे, महेश गवादे, संदीप खैरनार, किशोर खैरनार, अनिल बोरसे, ओमभाऊ पवार यांच्यासह गावात सुटीवर आलेले सैनिक, माता-भगिनी,तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रर्दशन वडील ह.भ.प.लोटन महाराज यांनी मानले.

Add Comment

Protected Content