शहरातील डॉक्टराची ऑनलाईन फसवणूक; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लाईट बिल भरण्याच्या नावाखाली एका डॉक्टर व्यवसायिका ५९ हजार ८७५ रुपयांचे ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, “भास्कर मार्केट येथील पंचम हॉस्पिटलचे  डॉ. दीपक पाटील हे आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. वैद्यकीय व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मोबाईलवर १५ जुलै रोजी वीज पुरवठा खंडीत होणार असल्याचा मॅसेज आलेला होता. शनिवारी १६ जुलै रोजी सकाळी ९.३० त्याच्या हॉस्पीटलमधील वीज पुरवठा बंद पडला.

त्यानुसार त्यांनी मोबाईलमधील मॅसेजमध्ये दिलेल्या क्रमांकावर फोन केला असता अनोळखी व्यक्तीने सांगितले की, इलेक्ट्रीक ट्रान्झेक्शन झालेले नाही. मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे सांगितले. लिंकवर क्लिक केल्यावर काहीही ट्रान्झेक्सशन झाले नाही. त्यानंतर समोरील व्यक्तीने नव्याने लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.

डॉक्टरांनी ॲप डाऊलोड केल्यानंतर ओटीपी देखील दिला. त्यानुसार त्यांच्या बँक खात्यातून एकूण ५९ हजार ८७५ रुपयांचा कमी झाल्याचे मॅसेज आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बँक खाते बंद केले. सोमवारी १८ जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content