जनावरांची कातडी व हाडे जवळ बाळणार्‍यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी ते उजाड कुसूंबा गावादरम्यान असलेल्या रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांची कातडी व हाडे बाळणार्‍यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथील गणपती नगरात गजानन प्रभाकर भोपळे (माळी) हे वास्तव्यास आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास सुप्रिम कॉलनी ते उजाड कुसूंबा गावादरम्यान असलेल्या रोडवरील खुपचंद साहित्या नगरजवळ संशयित शेख अङ्गसर शेख यूनूस (वय-४३, रा. लक्ष्मीनगर, मेहरुण) हे पत्र्याच्या शेडमध्ये दुर्गंधीयुक्त प्राण्यांचे कत्तल केलेली कातडी व हाडे कोणतीही परवाना नसतांना बाळगले होते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.

याप्रकरणी गजानन भोपळे यांच्या तक्रारीवरुन शेख अङ्गसर शेख यूनूस यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अनिस शेख हे करीत आहे.

Protected Content