जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेतर्फे शहरातील मुमूरादाबाद रस्त्यावरील लेंडी नाल्यावर पुलाजवळ खडीकरणाचे कामास आज सुरूवात करण्यात आली. या खडीकरण्याच्या कामांमुळे अनेक प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात हे काम काढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खडीकरणाचे कामास आज ममुराबाद रस्त्यावरील लेंडी नाल्याजवळ प्रारंभ करण्यात आले. मनपा प्रशासनाला काम करायचे होतं ते पावसाळ्याच्या आधी पण करू शकले असते असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. मक्तेदाराने कुठल्याही प्रकारचं मनपाला पत्र न देता व जळगाव ट्राफिक विभागाला पत्र न देता हे काम सुरू केल्यामुळे प्रवाशांची, सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असल्याचा प्रवाशांनी सांगितले. खडीकरणाचे काम सुरु करण्यात आल्याने प्रजापत नगर नाल्याच्या पुलापर्यंत दोन्ही बाजूने संपूर्ण ट्राफिक जाम झाली होती. नागरिकांनी या संपूर्ण मनपाच्या ढिसाळ नियोजनाबाबत संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खडीकारणामुळे छोट्या मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाजीनगर व ममुराबाद रस्ता बंद असल्याने नागरिकांना केवळ एकच रस्ता उपलब्ध असतांना याचे काम काढल्याने बाहेर गावच्या प्रवाश्यांसोबतच या परिसरातील नागरिक व शाळकरी मुले यांना त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच दिवसापासून पुल तयार झाला आहे. ठेकेदाराने जेव्हा वातावरण कोरडे होते तेव्हा काम करायला हवे होते अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. ठेकेदाराने ठेकेदाराने पोलिसांची मदत घेऊन रस्त्याचे काम सुरु आहे असे स्पष्ट करायला हवे होते. पावसाळ्यात डांबरीकरण करून रस्ता तयार करण्यात येत असल्याने हा रस्ता किती काळ टिकेल अशी शंका उपस्थित केली. महापालिकेचे अधिकारी या रस्त्याचे काम सुरु झाले तरी पाहण्यासाठी आले नाही असा आरोप नागरिकांनी केला.