साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साकेगाव येथील ग्रामपंचायतीने साकेगाव शिवारातील भुसावळला लागून असलेला भागाला गेल्या वर्षभरापासून जल जीवन मिशन अंतर्गत एक जलकुंभ व साकेगावतून एक जलवाहिनी नेण्यात आली आहे. त्या भागात अनधिकृतपणे नळ कनेक्शन देण्यात आले आहे. तरी संपूर्ण उन्हाळा हा जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहर हे हॉट सिटी म्हणून ओळखले जाते आणि वाट शेतीला लागूनच असलेला साकेगाव शहरातील महालक्ष्मी नगर ते स्वामी विहार अनेक छोटे-मोठे नगरांना 3300 रुपये प्रमाणे कनेक्शन पैसे घेण्यात आले. मात्र एक वर्ष होऊन सुद्धा त्या भागातील लोकांना साकेगाव ग्रामपंचायत आतापर्यंत पाणीपुरवठा करत नसल्यामुळे तेथील रहिवाशांचा नाईलाज झाल्यामुळे यांचा पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार याचा सुद्धा आता प्रश्न उपस्थित आहे होत आहे तरी येथील साकेगाव येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा का करत नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अनेक वेळा येथील महिला वर्गाला पाण्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. साकेगाव येथील कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पैसे घेतल्याचा येथील महिलांचा आरोप आहे की अमित नल कनेक्शनचे 3300 प्रमाणे पैसे भरले आहेत. मात्र आम्हाला स्मार्ट व्हिलेज नाव मोठे आणि लक्षण खोटे असलेल्या ग्रामपंचायत आतापर्यंत पाणीपुरवठा का करत नाही असा संतप्त सवाल येथील रहिवाशांमधून होत आहे. ज्या ज्या ग्रामपंचायतीने आम्हाला माहिती दिली त्या त्याप्रमाणे आम्ही कामे करत गेलो. मात्र स्मार्ट ग्राम पंचायत प्रशासन याकडे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तरी येथील ज्या कर्मचाऱ्याने पावत्या फाडल्या तो कर्मचारी ते का नाही असा सुद्धा प्रश्न या निमित्ताने तेथील रहिवाशांमधून बोलले जात आहे. तरी साकेगावला लागून असलेल्या भुसावळ शहराच्या व साकेगावच्या वेशीवर असलेल्या या भागात आतापर्यंत का पाणीपुरवठा होत नाही. जलजीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये पाण्यात गेल्याचे सुद्धा या ग्रामस्थांमधून बोलले जात आहे