पाच कोटींच्या सिगारेट चोरीतील फरार आरोपी अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । तब्बल पाच कोटी रूपयांच्या सिगरेट चोरी प्रकरणातील फरार आरोपीला पकडण्यात चाळीसगाव पोलिसांना यश आले आहे.

याबाबत वृत्त असे की, सुमारे चार कोटी ९४ लाख ६१२ रुपये किमतीचे सिगारेटचे खोके कंपनीत न नेता परस्पर विक्री करुन रिकामा कंटेनर २०१४ साली दि ११/४/२०१४ ते १७/४/२०१९ दरम्यान कन्नड घाटात उतरवुन चालकाने पलायन केले होते. यानंतर आता पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि युवराज रबडे, पो कॉ अभिमन पाटील, गोपाल बेलदार, गोवर्धन बोरसे या पथकाने फरार असलेल्या चालक आरोपी चालक बिजेंद्र श्रीचंद्र उर्फ मनविरसींग जयविरसींग खत्री (४२) रा सुरकनपुर ता जि झज्जर हरीयाणा आरोपीस ताब्यात घेतले आहे. त्याने सिगारेटचे खोके परस्पर विक्री केल्याची कबुली दिली आहे मागेच १६ मोटारसायकल चोरीचा आरोपी मुद्देमालासह अटक केला होता. यानंतर आती ही दुसरी सर्वात मोठी कामगीरी चाळीसगाव शहर पोलीसांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Protected Content