जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवशंकर कॉलनीत काहीही कारण नसतांना एका तरूणासह दोन भावांनी चॉपरने वार आणि काचेची बाटली डोक्यात टाकून गंभीर जखमी केले तर तरूणाच्या भावाला आणि आईला देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील शिवशंकर कॉलनीत स्वामी राजेंद्र पोतदार (वय ३१) हा तरुण वास्तव्यास असून तो सोनारी काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. १ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास त्याच परिसरात राहणारे दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई दोन्ही रा. शिवशंकर कॉलनी, जळगाव यांनी काहीही एक कारण नसतांना स्वामी पोतदार याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दीपक याने त्याच्याजवळील चॉपरने तर युवराज याने काचेची बाटली मरून स्वामीला जखमी केले. तसेच स्वामीच्या भावाला आणि आईला देखील मारहाण केली. यानंतर स्वामी पोतदार याने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार २ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता मारहाण करणारे संशयित आरोपी दीपक दगडू भोई व युवराज दगडू भोई (दोघ रा. शिवशंकर कॉलनी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.