चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीच्या १२ गणांसाठी निघालेल्या आरक्षणातून निवडणुकीची तयारी करणार्या अनेक मातब्बरांना धक्का बसला आहे.
तालुक्यातील १२ गणांसाठी पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यात १२ पैकी ६ गण हे अनु. जाती, जमातीसाठी राखीव झाल्याने, अनेक मातब्बरांना पंचायत समितीची निवडणूक लढता येणार नाही. तर दोन्ही प्रवर्गातील आरक्षण हे ५० टक्के असल्यामुळे तालुक्यातून ओबीसींसाठी एकही जागा राखीव ठेवण्यात आलेली नाही.
याप्रसंगी खालील प्रमाणे आरक्षण काढण्यात आले.
चुंचाळे- अनु. जाती (महिला)
धानोरा – अनु. जमाती
अडावद – अनु.जमाती
गोरगावले बु.- अनु.जमाती (महिला)
वर्डी- अनु. जमाती (महिला)
घोडगाव- अनु. जमाती (महिला)
चहार्डी- सर्वसाधारण
अकुलखेडा- सर्वसाधारण
विरवाडे- सर्वसाधारण
लासूर- सर्वसाधारण
कुरवेल- सर्वसाधारण (महिला)
नागलवाडी- सर्वसाधारण (महिला)
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता तालुक्याच्या ग्रामीण भागात रणधुमाळीस खर्या अर्थाने सुरूवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.