ग्रामपंचायत कर्मचारी काढणार आक्रोश मोर्चा

chopda morcha nivedan

चोपडा प्रतिनिधी । प्रलंबीत वेतनासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी ४ सप्टेबर रोजी पंचायत समिती कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार आहेत.

येथे तालुक्यातील ग्रा पं कर्मचार्‍यांचा मेळावा ग्रा. पं. कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष कॉ सत्तार तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका पंचायत समितीचे उपसभापती एम. व्ही. पाटील होते. राज्य महासंघाचे सचिव कॉम्रेड अमृतराव महाजन यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाजन यांची महासंघाचे राज्य सचिवपदी झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. उपसभापती पाटील यांनी आपल्या भाषणात कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत विशेषतः प्राव्हिडंट फंड बाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. कॉम्रेड महाजन म्हणाले की, सरकार ऑनलाईन पगाराचा हिस्सा देते पण पंचायती त्यांच्या हिस्सा टाकत नसलेने कर्मचारी ग्रा .पं .पगाराचे अनुदानावरच गूजराण करीत आहे, तेही तीन महिने पासून प्रलंबीत असलेने कर्मचारी वर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून येत्या ४ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता चोपडा पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी आपल्या भाषणात दिला. तसेच येत्या २८रोजी पूणे येथे राज्य व्यापी धरणे आंदोलनात कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले

याप्रसंगी अशोक गायकवाड, शेखर डावकर, शांताराम कोळी, रमेश मोरे, रमेश पाटील, ज्ञानेश्‍वर सुतार, विश्‍वास पाटील, गुलाब ठाकरे, धोंडू पाटील सिकंदर तडवी, प्रविण कोळी ,सूनिल बावीसकर. भाऊसाहेब पाटील ,रविंद्र पाटील,रमेश पवार, कूटलाल पावरा आत्माराम पाटील आदी उपस्थित होते. या मेळाव्यानंतर सभापती आत्माराम म्हाळके व उपसभापती पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

Protected Content