Home Cities चोपडा जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप

जगदीशभाऊ मित्र मंडळातर्फे दूध वाटप

0
30

chopda dudh vatap

चोपडा प्रतिनिधी । शहरातील श्रीक्षेत्र हरेश्‍वर मंदिरात आज शेवटच्या श्रावण सोमवारी माजी आमदार जगदीशभाऊ वळवी मित्र मंडळातर्फे भाविकांना दूध वाटप करण्यात आले.

यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना आज दिनांक २६ रोजी सकाळी १० वाजे पासून काजू,बदाम, केशरयुक्त दूध प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले माजी आमदार जगदीश वळवी हे श्री शंकराचे व महादेवाचे भक्त आहेत. दरम्यान, आज श्रावण मासाचा शेवटचा सोमवार म्हणून आज रोजी जगदीश भाऊ व मित्र परिवाराच्या वतीने सर्व भाविकांना दुध वाटप करण्यात आले. त्यांचे चिरंजीव चेतन वळवी यांनी स्वतः सकाळ पासून दूध तयार करण्यासाठी आपल्या मित्र मंडळासह परिश्रम घेतले. या दूधाचा हजारो भाविकांनी दूध प्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी किरण मोरे,नाना देसले,प्रवीण पाटील, वराड येथील माजी सरपंच सुनील महाजन,पत्रकार शाम जाधव आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound