चोपडा प्रतिनिधी । येथील यशोधन चिरटेबल ट्रस्ट व आर्किड इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमान 1 जुलै रोजी वृक्षारोपण हा कार्यक्रम शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड अंतर्गत साजरा करण्यात आला.
यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून शहर विभागचे पीएसआय रामेश्वर तुरनार, तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, समाजसेवी महेश शर्मा, पराग सोनार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. श्रीमती लिपिका नागदेव यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली, तर डॉ. राहूल पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील पर्यावरण व वृक्षसंवर्धनचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणावर आधारित प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेऊन आर्किड इंटरनॅशनल स्कूल मध्ये ग्रीन-डे साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहूल पाटील, डॉ. तृप्ती पाटील, प्रा. परमेश्वरी यांची उपस्थिती मिळाली. आभार प्रदर्शन नितेश वाघ यांनी केले व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षकवृदांनी परिश्रम घेतले.