चोपडा प्रतिनिधी । शहरात संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती व पुण्यतिथीच्या निमित्ताने उद्यापासून (दि. ८ ते २४ डिसेंबर) या कालावधीत रोज रात्री ८ ते १० या वेळेत तेली समाज मंगल कार्यालय, श्रीराम नगर येथे १७ दिवसीय अखंड ज्योति संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात दररोज विविध जाती-धर्माच्या संतांचे अभंग व १७ दिवशीय अखंड ज्योति संकीर्तन संपन्न होणार आहे.
सोहळ्याचे नियोजन
हरिभक्त परायण बापू महाराज लासुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.८ डिसेंबर रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज रेललाडली, दि.९ डिसेंबर रोजी ह.भ.प.प्रसाद बागुल महाराज चोपडा, दि.१० डिसेंबर रोजी ह.भ.प.अशोक महाराज शिरपूरकर, दि.११ डिसेंबर रोजी ह.भ.प.शांताराम महाराज शेंदुर्णी, दि.१२ डिसेंबर रोजी ह.भ.प.गजानन महाराज धानोरा, दि.१३ डिसेंबर रोजी हभप हेमंत महाराज अडावद, दि.१४ डिसेंबर रोजी ह.भ.प माधव महाराज धानोरा, दि.१५ डिसेंबर रोजी ह.भ.प अशोक महाराज आडगाव, दि.१६ डिसेंबर रोजी ह.भ.प.रविंद्र महाराज दहिवेलकर, दि.१७ डिसेंबर रोजी ह.भ.प. कन्हैया महाराज शेंदुर्णी, दि.१८ डिसेंबर रोजी ह.भ.प.चेतन महाराज मालेगाव, दि.१९ डिसेंबर रोजी ह.भ.प.भागवत महाराज शिरसोली, दि.२० डिसेंबर रोजी ह.भ.प.सोपान महाराज वडगाव, दि.२१ डिसेंबर रोजी ह.भ.प. विवेक महाराज वेले, दि.२२ डिसेंबर रोजी ह.भ.प.गोविंद महाराज कुरंगी, दि.२३ डिसेंबर रोजी ह.भ.प. बापू महाराज लासूरकर, दि.२४ डिसेंबर रोजी काला कीर्तन ह.भ.प.गजानन महाराज चौगाव असा कीर्तन महोत्सव रंगणार आहे.
यावेळी ह.भ.प.मृदंगाचार्य हर्षल महाराज चांदसर व गायनाचार्य ह.भ.प.गोविंद महाराज कुरंगी, ह.भ.प विठोबा महाराज घाडवेल, ह.भ.प शुभम महाराज हिंगोना यांची साथ लाभणार आहे. सदरची कीर्तने अनेक दात्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ सौजन्य दाखवून अनमोल सहकार्य केले आहे. या कीर्तन महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा या संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व सदस्य यांनी केले आहे.