बीजिंग वृत्तसंस्था । चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आजपासून (१० ऑक्टोबर) दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत.
जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अनौपचारिक वाटाघाटींची दुसरी फेरी होणार आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय संबधाबाबत आणि प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील. तसेच वाटाघाटी दोन दिवस चालणार आहेत. या मालिकेतील पहिली फेरी चीनमधील वुहान येथे गेल्या वर्षी पार पडली होती. या दोन दिवसांच्या वाटाघाटी आटोपून अध्यक्ष जिनपिंग नेपाळ दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी दिली. या वाटाघाटींमुळे द्विपक्षीय मुद्द्यांवर, प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या विषयांवर मतांची देवाणघेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.