‘जिओ’आउटगोइंग आता फुकट नाही ; अन्य नेटवर्कसाठी प्रति मिनिट सहा पैसे

Comprehensive List Of Reliance Jio Compatible Phones 1

 

मुंबई (वृत्तसंस्था) आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे.

 

जिओ’द्वारे लागू करण्यात येणारे हे शुल्क ‘जिओ’ ते ‘जिओ’ कॉल केल्यास, ‘जिओ’ ते स्थिरभाष दूरध्वनीवर (लॅण्डलाईन) कॉल केल्यास किंवा ‘जिओ’च्या इंटरनेटसेवेवरील व्हॉट्सअप किंवा तत्सम ध्वनीसंदेश (व्हॉईस कॉल) संपर्क सेवा पुरवणाऱ्या सुविधांसाठी लागू नसेल. याशिवाय, ‘जिओ’च्या वापरकर्त्यांना भरावे लागणाऱ्या या शुल्काची परतफेड कंपनीकडून इंटरनेट डेटा सेवेच्या शुल्कातून भरून दिले जाईल. म्हणजेच, तेवढ्या पैशांचा अधिकचा डेटा वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. दरम्यान ‘जिओ’वर येणारे (इनकमिंग) कॉल मात्र पूर्वीप्रमाणेच मोफत असतील. ‘जिओ’च्या नेटवर्कवर व्हॉइस कॉलिंग मोफत आहे. मात्र, त्यामुळे कंपनीला भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया आदी अन्य ऑपरेटर्सना करण्यात आलेल्या कॉल्ससाठी १३,५०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

Protected Content