
Crime 21
जामनेर (प्रतिनिधी)। येथून जवळ असलेल्या चिचखेडा तवा गावी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी गावातील शिवसेना कार्यकर्ते मोहन रामजोशी व त्याच्या परिवाराला लाठी काठीने लोखंडी रॉड मारहाण शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात आज सकाळी 17 मे रोजी अखेर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी मोहन रामा जोशी याला व त्याच्या परिवाराला लग्नामध्ये अष्टमंगल महिलांचे आवाजात म्हटले म्हणून या शुल्लक कारणावरून चिचखेडा गावी 14 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास शौचालयासाठी गेलेल्या मोहन जोशी याला घराकडे परत येत असताना रस्त्यात अडवणूक करून आरोपी अपील रामदास जोशी, सरपंच गंगाराम श्रावण जोशी, भगवान श्रावण जोशी, नारायण शेषराव जोशी, विनोद प्रकाश जोशी, प्रकाश बारकू जोशी, शेषराव श्रावण जोशी या यांनी संगनमताने मोहन जोशी याला लाठी- काठीने करून मोहन जोशी याला डोळ्याला केला दुखापत केली. शिवसेना कार्यकर्ते मोहन रामा जोशी यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किरण शिंपी हे करीत आहे. आरोपीला अजून अटक केली नाही.