जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज दि.2 सप्टेंबर रोजी सकाळी चिमुकल्यांच्या उत्साहात श्रींची स्थापना करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेतील शिक्षक छोटू पाटील यांनी सपत्नीक पुजा केली. विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमवर ठेका धरत गणपती बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”, “मंगल मूर्ती मोरया” अशा जयघोषात बाप्पाची मिरवणूक निघाली होती. विद्यार्थींनी स्वत: ढोल वाजवले, यावेळी शिक्षकांनीही नाचत गणरायाचे आगमन केले. तसेच प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा आणि सुंदर शहर जळगाव शहर असे संदेश ही देण्यात आले. कलाशिक्षकांनी व सहकार्यांनी पर्यावरणपूर्वक आरास तयार करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्यासह शिक्षकवृंद आणि कर्मचारी उपस्थितीत होते.