एरंडोल, प्रतिनिधी | एरंडोल-पारोळा मतदारसंघातून २०व्या फेरी अखेर शिवसनेने निर्णायक आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांना शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी विजय मिळविला आहे.
शिवसेना उमेदवार चिमणराव पाटील यांना २० व्या फेरी अखेर ७८ हजार ३३६ मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश पाटील यांना ६० हजार ६४३ मते मिळालीत. चिमणराव पाटील हे १७ हजार ६९३ मतांनी पुढे होते. चिमणराव पाटील यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. चिमणराव पाटील यांनी सतीश पाटील यांचा १८ हजार २ मतांनी पराभाव केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे गौतम पवार यांना २३०३ तर बहुजन समाज पार्टीचे संजय लोखंडे यांना ६३५ मते मिळाली आहेत.