मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटलांना आघाडी

chandrakant patil muktainagar

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी पुरस्कृत बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसे यांच्याविरूध्द निर्णायक आघाडी घेतली असून बाकी असणार्‍या एका फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांचे तिकिट कापून त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांना तिकिट जाहीर केले होते. येथून नाथाभाऊंचे कट्टर विरोधक चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली. शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादीने त्यांना पुरस्कृत केले. या दोन्ही उमेदवारांनी जोरात ताकद लाऊन प्रचार केला. यामुळे ही लढत अतिशय चुरशीची झाली. अगदी पहिल्या फेरीपासून कधी पाटील तर कधी खडसे यांना आघाडी मिळाली. दरम्यान, आता एक फेरी बाकी असतांना चंद्रकांत पाटील यांना पाचशे मतांची आघाडी मिळाली आहे. यामुळे आता एका फेरीत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content