Home Cities मुक्ताईनगर चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी चिमुकल्यांची प्रार्थना

चंद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगसाठी चिमुकल्यांची प्रार्थना


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १४ जुलै रोजी भारताने चंद्रावर पाठविलेल्या चंद्रयान-३ चे आज संध्याकाळी चंद्रावर ६ वाजून ४ मिनीटांनी  लँडिंग होणार आहे. हे लँडिंग यशस्वीपणे व्हावे आणि भारत देशाचा सर्व जगामध्ये गौरव व्हावा म्हणून आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडसगाव  येथे चिमुकल्यांनी देवाकडे प्रार्थना केली.

यावेळी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चंद्रयान-३  च्या बाबतीत माहिती दिली. आणि संध्याकाळी ६ वाजून ४  मिनिटांनी दूरदर्शनवरील प्रक्षेपण पहावे असे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापक अनिल पवार, भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे व स्वाती फिरके उपस्थित होत्या.


Protected Content

Play sound