बाल लैंगिक अत्याचार : सात महिन्यांपासून फरार संशयित महिला ताब्यात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्ह्यातील सात महिन्यांपासून फरार असलेल्या संशयित महिला आरोपीला बुधवार, ८ जून रोजी सकाळी ७ वाजता शहरातील कांचन नगर परिसरात पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कांचन नगर, असोदा रोड जळगाव येथील रहिवासी २३ वर्षीय सपना सागर पाटील या महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, “बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी संशयित आरोपी सपना पाटील हिच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात १० डिसेंबर २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित महिला आरोपी सपना पाटील ही फरार होती. दरम्यान ती महिला कांचन नगर परिसरात असल्याचीगोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पेालीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाडे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक दत्तात्रय बडगुजर, पोना विकास सातदिवे, गणेश शीरसाळे, योगेश बारी, पोकॉ छगन तायडे व महीला पोकॉ सपना येरंगुठला, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील यांनी कारवाई करत बुधवार ८ जून रोजी सकाळी ७ वाजता कांचन नगर परिसरात जैनाबाद येथून संशयित महिला आरोपी सपना पाटील हिला ताब्यात घेतले आहे.” याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content