जळगाव (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील भारत दूरसंचार निगमच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना आर्थिक मदत व्हावी. म्हणुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 52 हजार 951 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे सुपूर्द केला.
भारत दूरसंचार निगमच्या संघटनेकडून त्यांच्या विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे न्याय प्रश्न सोडविले जातात. कर्मचारी हित लक्षात घेत असताना आपणही समाजाचे देणे लागतो. या उद्देशाने संघटनेने मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. यावेळी भारत दुरसंचार निगम संघटनेचे महाराष्ट्र सचिव आर. एन. पाटील, विभागीय कोषाध्यक्ष अरूण इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष एस. आर. पाटील, एस. एन. चौधरी, एम. बी, साखरे, डी. ए. सोनोने आदि पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
संघटनेने सामाजिक बांधिलकेतून केलेल्या या कार्याचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कौतुक केले.