धरणगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील धरणगाव येथे दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. स्वागत झाल्यावर नियोजित कार्यक्रमासाठी जात असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “माझ्यासोबत वाहनात या ” असे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जळगाव जिल्हा व मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चाही झाली.
ना .गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील पालकमंत्री शेत पाणंद रस्त्या साठी शेतकऱ्यांच्या व ग्रामपंचायतीच्या वाढत्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी शेतरस्त्यांसाठी कमीत कमी 60 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करणे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत धरणगाव येथील बालकवी ठोंबरे स्मारक व परिसर विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करणे. नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायती मध्ये रुपांतर करण्याचा परिपूर्ण प्रस्ताव शासना कडे प्रलंबित असून त्यास मंजुरी देणे. असोदा येथील कवियत्री बहिनाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी डीपीडीसी अंतर्गत ५ कोटींची मंजुरी असून हा निधी कमी पडत असल्याने अतिरिक्त ७ कोटी रुपये निधीच्या प्रस्तावास मान्यता देणे. जळगाव – धरणगाव – चोपडा तालुक्याला जोडणारा भोकर नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी 70 कोटी रुपये निधी मंजूर करणे. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर वाहतुकीसाठी एकमेव असलेल्या पुलाला बांभोरी जवळील गिरणा नदीला लागून असलेल्या ब्रिटिश कालीन पुलाला समांतर पूल बांधकामासाठी ४० कोटी रुपयांची तरतूद करणे. धरणगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील पाइप-लाइनच्या कामासाठी नगरपालिकेने शासनाकडे प्रस्तावित केलेल्या ५० कोटीच्या प्रस्तावास मंजुरी मिळणे. कवित्री बहिनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ” संत साहित्य अध्यासन केंद्र ” स्थापनेसाठी मंजुरी मिळणे बाबत विद्यापीठाने शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यास मंजुरी देणे बाबत. जळगाव शहरातील बस स्थानकाला आधुनिक बस साठी निधी मिळावा तसेच बस स्थानक आगारात डांबरीकरण व काम करण्याच्या कामास मंजुरी मिळावी. राज्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना वीरमाता वीरपत्नी यांना कृषी प्रयोजनासाठी जमीन देण्याबाबतची कार्यवाही तात्काळ होणेसाठी सर्व जिल्हाधिकारी यांना आदेशीत करण्यात यावे अश्या महत्वाच्या व विकास कामांच्या विषयी लेखी प्रस्ताव देऊन चर्चाही केली.
भजनी मंडळांना वार्षिक अनुदाना देणे बाबत साकडे
राज्यातील गावा-गावांमध्ये भजनी मंडळा मार्फत अत्यंत शिस्तबद्ध व निष्ठेने समाज प्रबोधनाचे व राष्ट्रीय एकात्मता जोपासून संतांचे महत्व व त्यांचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत असतात. भजनी मंडळांना रजिस्ट्रेशन करणे, भजनी मंडळ साहित्य खरेदी करणे व इतर कामांसाठी प्रत्येक भजनी मंडळांना वर्षाला ५० हजार रुपये अनुदान देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही साकडे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी घातले आहे. या महत्त्वाच्या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन ना गुलाबराव पाटील यांना दिले.