मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची यादी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नसल्याने आता त्यामधून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची नावं वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार आहेत यात राजू शेट्टीं यांनी स्वतःच नकार दिलाय तर एकनाथ खडसें यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मुख्यमंत्री यांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आधीच्या यादीत एकनाथ खडसे, राजू शेट्टी यासह इतर राजकीय नेत्यांची नावं वगळण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात ही नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती आहे.
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची शिफारस करुन दीड वर्षे झाली तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असणारे एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी तसेच इतर नावं वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेत नवी यादी राज्यपालांना पाठवणार आहे. नव्या यादीत प्रोटोकॉल पाळून वेगवेगळ्या क्षेत्रातून ही नावं पाठवण्यात येणार असल्याने या नावांना राज्यपालांची हरकत नसेल अशी रणनीती महाविकास आघाडीकडून आखण्यात येत आहे.
राजू शेट्टी यांनी आधीच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आपलं नाव या यादीतून वगळावं यासाठी त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आगामी निवडणुकीत संधी दिली जाण्याची अशी चर्चा सुरु आहे.