मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या दौर्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहे. उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. ठाकरेंच्या दौर्यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौर्याला सुरूवात होणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौर्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
अलीकडेच औरंगाबाद येथे शेतकर्यांच्या भेटीला उद्धव ठाकरे गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौर्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये राज्यातल्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका आहेत, यामध्ये मुंबईचा समावेश आहे. यासोबत नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्याही निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे महत्त्वाचे ठरणार आहेत.