जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | ‘बाला या उपक्रमा’तर्गत तालुक्यातील डोहरी तांडा शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेत सुंदर सुशोभिकरणासह चांगल्या रितीने व्यवस्थापन सुरु असल्याचे समाधान या भेटी दरम्यान त्यानी व्यक्त केलं.
जिल्हा परिषद शाळा डोहरी तांडा येथे शिक्षकातर्फे सुशोभीकरण व शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम, शाळेतील रंगरंगोटी उपक्रम, प्रोजेक्टर, सापशिडी, सूर्यमाला, शब्दभिंती, रेनवॉटर हार्वेस्टिंग, परसबाग, घनकचरा व्यवस्थापन, बालोद्यान, प्रशासकीय विभाग, गणितीय संबोध, लॅन, भौमितिक आकृत्या, विज्ञान प्रयोग शाळा तसेच शाळेतील इतर ठिकाणी विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पूरक उपक्रम रेखाटन केले.
भौगोलिक माहिती तक्ते, देशापासून गावापर्यंतचे नकाशे हे सर्व पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे शिक्षक अभिनंदन केले. विशेष बाब म्हणजे शिक्षक वर्गणीसह लोकवर्गणीतून इतर बाबीवर तसेच इतर सर्व खर्च मुख्याध्यापक यांनी आपल्या स्वः खर्चातून केला. जवळपास अडीच लाख रुपये खर्च करण्यात आला असून जि प शाळा तांडा येथील मुख्याध्यापक राजेंद्र केदारे त्यांच्या कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला.
लवकरच मा.पालकमंत्री यांच्या हस्ते शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच गावकरी व अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळेतील शिक्षक राहुल सपकाळ यांनी उपस्थितांना माहिती सांगितली.
याप्रसंगी गट विकास अधिकारी अतुल पाटील गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, विस्तार अधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी अशोक पालवे, जिल्हाध्यक्ष सलीम शेख, ग्रामसेवक शरद पाटील, सरपंच, शिक्षण समिती अध्यक्ष, सदस्य आदींची उपस्थिती होती.