जळगाव (प्रतिनिधी) जन्मदात्या बापानेच आपल्या मुलीला वासनेचा बळी बनवत तिच्यावर सलग तीन वर्ष बलात्कार केल्याची घृणास्पद घटना शहरातील एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव महावितरणमध्ये वाहन चालक असलेल्या नराधम बापाने ही माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. पीडित मुलीने तक्रारीत तिच्या नराधम बापाने २०१६ ते २०१९ वेळोवेळी बलात्कार केला असल्याचे म्हटले आहे. हा नराधम पत्नी बाहेर गेल्यानंतर मुलीला धमकी दाखवीत अत्याचार करायचा. एमआयडीसी पोलिसांनी या नराधमावर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ अन्वय तसेच अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवला त्याला अटक केली आहे. सततच्या लैंगिक शोषणाच्या प्रकाराला कंटाळून आज अखेर पिडीत मुलीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.