मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील बहुचर्चित 2001 मधील हत्याकांड प्रकरणाचा निकाल तब्बल 23 वर्षांनी आला आहे. जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी अंडर डॉन छोटा राजन दोषी ठरला आहे. त्याला मकोका अंतर्गत न्या. ए.एम.पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींना यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झाली होती.
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्या 4 मे 2001 झाली होती. या प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा आणि 16 लाखांचा दंड करण्यात आला. जया शेट्टी यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे ग्रँट रोडमधील गोल्डन क्राऊन हॉटेलमध्ये राजनच्या हस्तकांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. राजन गँगने रवी पुजारीमार्फत जया शेट्टीकडून 50 कोटींची खंडणी मागितली होती. या प्रकरणातील अन्य आरोपी अजय मोहिते, प्रमोद धोंडे आणि राहुल पावसरे यांना साल 2013 मध्येच कोर्टाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. आता छोटा राजन यालाही शिक्षा झाली आहे.