Home Cities अमळनेर कारण नसतांना महिलेला शिवीगाळ व मारहाण

कारण नसतांना महिलेला शिवीगाळ व मारहाण

0
109


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पिळोदा गावात काहीही कारण नसतांना एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना १ जून रोजी दुपारी १२ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी ४ जून रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा रामा सोनवणे वय ५४ रा. पिळोदा ता. अमळनेर या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १ जून रोजी दुपारी १२ वाजता महिला ह्या घरी असतांना गावात राहणारे भगवान विलास सोनवणे, विलास देवसिंग सोनवणे आणि सुनंदा विलास सोनवणे या तिघांनी कारण नसतांना शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने मंगळवारी ४ जून रोजी अमळनेर पोलीसात धावा घेवून तक्रार दिली. त्यानुसार भगवान विलास सोनवणे, विलास देवसिंग सोनवणे आणि सुनंदा विलास सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound