हा संशोधन प्रबंध कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेअंतर्गत भौतिकशास्त्र विषयात सादर करण्यात आला. या संशोधनासाठी जयहिंद एज्युकेशनल ट्रस्टच्या झेड. बी. पाटील महाविद्यालय, धुळे येथील मायक्रोवेव्ह रिसर्च लॅबोरेटरीचे प्राध्यापक तथा सध्या नाशिक येथे कार्यरत असलेले डॉ. प्रवीण रघुनाथ चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सौ. छाया कैलास भामरे (पाटील) यांनी मिळविलेल्या या शैक्षणिक यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात पुढे जाण्याची नवी प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल नायगाव (ता. यावल) तसेच कापडणे (ता. धुळे) परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सौ. छाया या पंकज पाटील व जयवंत पाटील यांच्या भगिनी असून भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांच्या देखील भगिनी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



