Home Cities जळगाव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
102

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी कोर्ट चौक परिसरातील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या पराक्रमाचे स्मरण करण्यात आले.

कंजरभाट समाज युवा फाउंडेशन तर्फे आयोजित या कार्यक्रमात सकाळपासूनच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी संपूर्ण परिसर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

या प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, वीर दहियेकर, गणेश बागडे, कार्तिक बाटूंगे, नमन गारुंगे, जितू नेतले यांच्यासह कंजरभाट समाजातील अनेक युवक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजात एकता, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.

 


Protected Content

Play sound