मुंबई प्रतिनिधी । अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘छपाक’ रिलीज होण्यापूर्वी वादाच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपट ‘छपाक’ उद्या दि.१० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तात्पुर्वी अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिल अपर्णा भट्ट यांना सिनेमात क्रेडिट न दिल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची न्यायालयात त्यांनी मागणी केली आहे.
वकील अपर्णा भट्ट यांच्या मते, अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालची ती अनेक वर्ष वकील आहे. असे असतानाही सिनेमात तिला क्रेडिट देण्यात आले नाही. याचविरुद्ध भट्ट यांनी दिल्लीतील पटियाला हाउस कोर्टात सिनेमावर बंदी आणण्याची याचिका दाखल केली आहे.उद्या दि.१० जानेवारीला प्रदर्शित होत आहे. मात्र त्यापुर्वी
शुक्रवारी देशभरात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याआधी अपर्णाने तिच्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट लिहून सिनेमात तिला क्रेडिट न दिल्याचे सांगितले होतं. याशिवाय निर्मात्यांविरोधात ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही तिने या पोस्टमध्ये लिहिले होते. अपर्णाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘छपाक पाहिल्यानंतर मी अधिक अस्वस्थ आहे. मला माझी ओळख वाचवण्यासाठी आणि माझा प्रामाणिकपणा टिकवून ठेवण्यासाठी मला कायदेशीर कारवाई करावी लागत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा पटियाला हाउसमध्ये मी लक्ष्मी अग्रवालचे प्रतिनिधित्व केले होते. उद्या कोणी माझे प्रतिनिधित्व करेल. आयुष्याची हीच विडंबना आहे.’ यानंतर तिने दीपिका आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही उल्लेख केला.