दुचाकीचे स्पेअर पार्ट काढून वाहनाधारकांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गॅरेजवर टाकलेल्या दुचाकीचे स्पेअर पार्ट काढून वाहनाधारकांची लाखो रूपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाहनधारकांची फसवणूक करणाऱ्या एकावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, परेश सोपान ढगे (वय-२२) रा. वाघळी ता.चाळीसगाव जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आला उदरनिर्वाह करतो. शेतीकामासाठी त्याच्याकडे (एमएच १९ डीएल ७३९०) दुचाकी आहे. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी दुचाकीमध्ये बिघाड झाल्याने परेश ढगे याने दुचाकी दुरूस्ती करण्यासाठी जळगावातील प्रेमनगरातील डी.सी.बाईक केअर गॅरेज येथील धिरज अनिल चव्हाण यांच्याकडे टाकलेली होती. दुचाकी दुरूस्तीसाठी परेशने ३ हजार रूपये ऑनलाईन दिले होते. दरम्यान, वारंवार दुचाकीबद्दल विचारणा केल्यानंतर धिरज हा उडवाउडवीची उत्तरे देत होता. रविवारी ३ जुलै रोजी परेश हा त्याचा मामा याच्यासोबत गॅरेजवर आले. त्यावेळी त्याच्या दुचाकीचे स्पेअर पार्टस वेगवेगळे दिसून आले. तर महत्वाचे पार्टस दिसून आले नाही. याबाबत धिरज चव्हाण याला विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार परेशने  अधिक चौकशी केली असता त्याच्यासारखे इतर पाच जणांना देखील याच पध्दतीने दुचाकी दुरूस्तीला असून फसवणूक करत असल्याचे समोर आले. यात राजेंद्र शेषेराव जोगदंड रा. नेहरू नगर जळगाव यांचे  रिपेअरींगसाठी दिलेले ३० हजार रूपये आणि ७० हजार रूपये किंमतीची दुचाकी (एमएच ०१ बीसी ७२०६), जयेश राकेश लढ्ढा रा. लक्ष्मीनगर जळगाव यांची रिपेअरींसाठी दिलेले ३० हजार रूपये ७० हजार रूपये किंमतीची (एमएच १५ डीवाय ०६७०) दुचाकी, विशाल अशोक जगदाडे रा. सराफ बाजार, जळगाव यांची ८० हजार रूपये किंमतीची दुचाकी (एमएच १९ सीके ०००२), अनिल एकनाथ कोळी रा. निमखेडी जळगाव यांची ६० हजार रूपये किंमतीची (एमएच ०३ बीजी ६९९९) आणि रिपेअरींगसाठी दिलेले १८ हजार रूपये अशाप्रकार पाच जणांकडून ४ लाख ६३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल व रोकड घेवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याबाबत रविवारी ३ जुलै रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धिरज अनिल चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयकुमार सोनार करीत आहे.

Protected Content