जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेत गट नंबर ८ मधील शेती हे भागपूर मातीच्या धरणासाठी अधिग्रहित केलेली असतांना शेतातून जास्तीचा मोबदला मिळविण्यासाठी आंब्यांची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भागपूर शिवारातील शेतात शेत गट क्रमांक ८ मधील शेती हे महाराष्ट्र शासनाने भागपूर मातीच्या धरणासाठी अधिगृहित केले आहे. असे असतांना देखील शेतातील मोबदला जास्त मिळावा, यासाठी शेतात अंब्याची झाडे लावून शासनाची फसवणूक केल्याचे मंगळवार १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता समोर आले.
हा प्रकार लक्षात असल्यानंतर शासनाचे कर्मचारी हेमंत मुरलीधर गीरी यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार नेहा जितेंद्र अग्रवाल, जितेंद्र हनुमानदास अग्रवाल, निधी निखील पसारी, अनिता अनुप अग्रवाला सर्व रा. आर.जे.टॉवर, भास्कर मार्केट जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान करीत आहे.