लग्न जमवून देण्याचे सांगत एकाची फसवणूक; वरणगाव पोलीसात पाच जणांवर गुन्हा

वरणगाव प्रतिनिधी । मुलाचे लग्न जमवून देतो देतो असे सांगून औरंगाबाद येथील एकाची १ लाख १५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भगवान सिताराम सुरडकर (वय-७४) रा. अंबाई ता. सिल्लोड जि.औरंगाबाद हे त्यांच्या मुलगा गणेश सुरडकर यांच्या लग्नासाठी वधूच्या शोधात होते. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथील रमेश सांडून शिंबरे यांची ओळख झाली. त्यांनी मुलाचे लग्न जमवून देतो असे सांगत पैश्यांची मागणी केली. यासाठी छाया दर्याव मिना रा. सुप्रिम कॉलनी जळगाव, अशोक तायडे, संजय अशोक कुळकर्णी (तोतया) दोन्ही रा. खिर्डी ता. रावेर, ज्योती अशोक कुळकर्णी रा. वरणगाव यांनी संगनमत करून भगवान सुरडकर यांच्याकडून १ लाख १५ हजार रूपये घेतले. परंतू मुलाच्या लग्नासंदर्भात कोणतेही निर्णय होत नसल्याने त्यांनी पैश्यांची मागणी केली. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच भगवान सुरडकर यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ नागेंद्र तायडे करीत आहे. 

 

Protected Content