चोपडा (प्रतिनिधी) ‘चोसाका’साठी संस्थापक अध्यक्ष धोंडूअप्पा पाटील यांनी जीवाचे रान करून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेला सहकारी तत्वावरचा साखर कारखाना शेतकऱ्यांकडून भांडवल जमा करून उभारला. परंतू आता ‘चोसाका’ भाडेतत्वावर देण्याचा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणारा असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ.अमृतराव महाजन यांनी केली आहे.
कॉ.अमृतराव महाजन यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे की, ‘चोसाका’ मुळे तालुक्यातील शेतकरी व कामगारांचे भाग्य उजळेल अशा आश्वासक विश्वासार्हता कधीकाळी निर्माण झाली होती.’एकमेका साह्य करू अवघे धरू सूपंथ’ या तत्वाचा खराखूरा गुण अंगीकारून चोसाका उभा केला गेला. परंतू कालांतराने या कालखान्यास दूरदर्शी व सहकार चळवळीचा गंध असलेले नेतृत्व मिळाले नाही. त्यामुळे परिसरात ऊसाचे लागवडी योग्य क्षेत्र असतांना गेल्या 10 वर्षात या कारखान्याची पूर्णतः वाताहत झाली. शेतकरी, कामगारांचे करोडो रूपयाची देणी थकित ठेऊन संचालक मंडळ सहीसलामत बाहेर पडू ईच्छीत आहे. त्यासाठी भाडेतत्वावर देण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलाय. परंतू हा निर्णय बेकायदेशीर व सहकार नियमांविरूद्ध आहे, अशी टिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ अमृतराव महाजन यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
पत्रकात पूढे म्हटले आहे की, कारखान्याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तालूक्यातील सभासद शेतकरी व कामगारांची सभा घेऊनच निर्णय घ्यावयास हवा होता. पण तसे न करता सर्वपक्षीय नेते नावाचा गैरवापर करून संचालक मंडळाने चोसाका भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला तालूक्यातील चोसाका हितचिंतक तालुक्याचा विकासप्रेमी शेतकरी कामगारांचा विरोधच आहे. हा लोकशाही व सहकार तत्वाशी प्रतारणा करणारा आहे. चोसाका सहकारी तत्वावर चालवण्यास फेल झालेले संचालक मंडळी शेतकरी व कामगारांचे देणे देऊन हा निर्णय घेतला असता, तर कदाचित ते संयूक्तिक झाले असते. राज्यात अनेक कारखाने भाडेतत्वावर देण्याचा निर्णय झाले. पण शेतकऱ्यांचा फायदा न होता तोटाच जास्त झालाय. त्यासाठी लवकरच तालूक्यातील समविचारी सहकार प्रेमी चोसाका हितचिंतक याची बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती देखील कॉ अमृतराव महाजन रघूनाथ बाविस्कर,निंबा बोरसे, शिवाजी पाटील, वासूदेव कोळी आदींनी केले आहे.