Home Cities जळगाव चर्मकार समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात

चर्मकार समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात

0
72

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा चर्मकार समाजातर्फे रविवारी वाघनगरातील रोहिदास प्रतिष्ठान हॉलमध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थांना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमात आमदार सुरेश भोेळे, आमदार संजय सावकारे, धरणगाव उपनगराध्यक्षा अंजली विसावे, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, नगरसेविका सुरेखा तायडे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, माजी शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड, गटशिक्षणाधिकारी यशवंत ठोसरे, विजय पवार, डॉ. सुनील सूर्यवंशी, डॉ. सपंत वानखेडे, कैलास वाघ, पी. आर. आंबेडकर, प्रा. गणेश सूर्यवंशी, ज्योती निंभोरे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्याा हस्ते गुणवंतासह पालकांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच५० गरीब होतकरू विद्यार्थांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी आयआयटी प्रवेशासाठी निवड झालेल्या हिरेन अनिल बाविस्कर, यश संतोष मोरे, मयूर शंकर वारे, संजू तुषार मोरे, दिव्या संतोष मोरे, महेश प्रदीप शेकोकार, गौरवी दीपक मोरे, नीलेश संजय बाविस्कर, रोहन जितेंद्र वानखेडे, शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण आशिष देविदास वाघ, हेमांगी अहिरे यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. सुनील सूर्यवंशी, किरण मोरे यांच्याकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, के. पी. भोळे व प्रा. विठ्ठल सावकारे यांच्याकडून रोख बक्षिसे, प्रा. गणेश सूर्यवंशी व खंडूजी पवार यांच्याकडून शालेय साहित्य भेट दिले. विजय पवार यांनी ५ हजाराची मदत जाहीर केली. संजय वानखेडे, प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. कैलास वाघ यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound