चार बेशिस्त रिक्षाचालकांवर दंडात्मक करवाई

riksha chalak

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरात मुलीची छेडछाड, चाकूहल्ला आणि चोरीचे गुन्ह्यांचे प्रमाणात वाढ होत आहे. सोबत रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा आणि अडमुठेपणामुळे प्रवाश्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्हा पेठ पोलीसांनी चार रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मद्यधुंद तरूणाने रिक्षात एका तरूणीची छेड काढल्याची घटना बुधवारी घडली होती. यामुळे शहरातील वातावरण गढूळ झाले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीत रिक्षा चालकांचा सहभाग अधिक प्रमाणावर असल्याचे हात असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आज जिल्हा पेठ पोलीसांनी नवीन बसस्थानकासमोर असलेल्या बेशिस्त चार रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यात रिक्षा क्रमांक एमएच 19 व्ही 6914, एमएच 19 व्ही 8727, एमएच 19 व्ही 6629 आणि एमएच 19 व्ही 0818 यांचा समावेश आहे.

रिक्षा चालक करतात गैर इशारे करून महिलांची छेडछानी
एखादी रेल्वे आल्यानंतर आलेल्या प्रवाश्यांना एक इच्छीत स्थळी जाण्यासाठी काहीवेळा रिक्षाचालक बळजबरी करतो. बसस्थानक आणि रेल्वेस्थानकच्या बाहेर रिक्षा चालकांची ही मनमानी सुरू होते. दोन्ही ठिकाणी रिक्षा चालकांना रिक्षा चालविण्यासाठी जागा देखील देण्यात आली आहे. या जागांचा वापर न होता भररस्‍त्यावर रिक्षा उभी करून प्रवाश्यांची वाहतूक केली जाते. रात्री उशीरापर्यंत महिला प्रवाशीला रिक्षा चालक गैर इशारे करून छेडछानी होत असल्याची प्रकार होत आहे. मात्र स्वत:ची बदनामी होऊ नये म्हणून काही महिला किंवा तरूणी याकडे दुर्लक्ष करीत घटनेवर पडदा टाकला जातो. बुधवारी भरदिवसा मद्यधुंद तरूणाने रिक्षात एका तरूणीची छेड काढल्याची घटना बुधवारी घडली यात रिक्षाचालकाचा सहभाग असल्याचे दिसून आले. मात्र तरूणीच्या प्रसंगावधानाने तिने आरडाओरडा केल्यानंतर एक प्रकार समोर आला.

Protected Content