श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । तांत्रिक कारणांमुळे चांद्रयान-२ या मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, नियोजित कार्यक्रमानुसार १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन अवकाश केंद्रातून चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते. यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या प्रक्षेपकाचा उपयोग केला जाणार होता. तथापि, लाँच व्हेईकलमध्ये किरकोळ त्रुटी आढळून आल्यामुळे चांद्रयान-२ चे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोतर्फे देण्यात आली आहे. प्रक्षेपणाच्या नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही इस्त्रोने नमूद केले आहे.